युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा


- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गडचिरोली :
युवतीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ओरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी गुरुवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी ठोठावली आहे. सुनील मारोती चिमुरकर (४५) रा.एकोडी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.  याबाबत सविस्तर असे की, २४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पीडित युवती आपल्या गावी असताना सुनील चिमुरकर याने तिला सायकलवर बसवून आपल्या गावी नेले. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडितेने चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी सुनील चिमुरकर याच्यावर भादंवि कलम ३७६ (फ) व ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा निकाल १२ डिसेंबर रोजी लागला. फिर्यादी व अन्य साक्षदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुनील चिमुरकर यास भादंवि कलम ३७६ (फ) अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-12


Related Photos