जामगाव येथे जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते केंद्रस्तरीय बालक्रीडा सम्मेलनाचे थाटात उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरी-महागाव केंद्राचे बाल  क्रीडा व कला संमेलन जामगाव येथील पटांगणात आयोजित करण्यात आले होते. सदर बालक्रीडा सम्मेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते दीप व मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. या सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके होत्या. विशेष अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आलाम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या छायाताई पोरतेट, चुटुगूंटा ग्रा.पं. सरपंच सुधाकर नैताम, राजापूर पैच ग्रा. पं. सरपंच रामलूजी कुडमेते,  ग्रा. पं. बोरी सरपंच अरुणाताई सोयाम, महागाव ग्रामपंचायत उपसरपंच मारोती कर्मे, म हागाव (बु.) सरपंच विनायक वेलादी, ग्रा. पं. खमनचेरू सरपंच मंजुडा आत्राम, शा. व्या. स. बोरी अध्यक्ष नरेश बापू गड्डमवार, शा. व्या. स. रामपूर ( रै.) अध्यक्ष पेंटू पनेमवार, वेंकटी टोबरे, जामगाव येथील पोलीस पाटील अरविंद निखाडे, जामगावचे प्रतिष्ठित नागरिक परदेशी पोटे, श्रीनिवास डोके, संतोष पिपरे, वैशालीताई बसारकर, शा. व्य. समिती चितलपेटचे हन्मंतु कुळमेथे, दिवाकर आलाम, प्रकाश दुर्गे, शंकर कोंडागुर्ले, प्रशांत गोडशेलवार, केंद्रातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. या सम्मेलनात केंद्रातील २६ शाळा मधील ८९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या सम्मेलनाच्या यशस्वीसाठी केंद्रातील केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे झांकी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रफुल मंडल तर संचालन शैलज गोरेकर यांनी केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-12


Related Photos