महत्वाच्या बातम्या

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे दीक्षाभूमी येथे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ होणार आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. काही कालावधी नंतर येथे एक भव्य स्तूप उभारला असून याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. लाखो अनुयायांचे हे श्रद्धास्थान असून दरवर्षी दसरा सणाला याठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन केले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दूर सर्कीटची प्रसिद्धी व प्रचालन करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी, शांतीवन, नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुध्दिझम, ड्रॅगन पॅलेस या स्थळांचे टूर सर्किट तयार करण्यात आले आहे. ही सहल दीक्षाभूमी येथून ३, ४ ७ व ८ डिसेंबर रोजी एक दिवसीय निःशुल्क सहल आयोजित करण्याचे नियोजन आहे. या सहलीचे आरक्षण ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos