गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - अजय कंकडालवार


- ५० जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात काही प्रमाणात अस्यापही शिक्षण विषयक समस्या कायम आहेत. याकडे आपण आता गांभिर्याने लक्ष देवून जिल्हयातील सर्व ५० जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करुन संपूर्ण जिल्हयातील शैक्षणिक समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयन्त करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अजय कंकडालवार यांनी बोलून दाखवली आहे. जिल्हयातील शाळांची स्थिती कशी आहे, शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या किती आहे, विदयार्थ्यांना शैक्षणिक सोयी -सुविधा मिळतात की नाही या संदर्भात जिल्हयातील सर्व ५० ही जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. यासोबतच शाळांमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कशापद्धतीने देता येईल याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे अजय कंकडालवार म्हणाले आहे.
आरोग्य, रस्ते, पाणी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे हया समस्या सोडविणे जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे या समस्यांकडे सुद्धा आपण आता गांभिर्याने लक्ष देणार आहोत. जिल्हयातील मोडकडीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी वर्गखोल्याचे बांधकाम करणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सोया करणे, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे याबाबत जिल्ह्यातील सर्व ५० जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करून त्या - त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयन्त करणार असल्याचे कंकडालवार यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी व विद्यार्थ्यांचा या शाळांकडे कल वळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मोठया प्रमाणात निधी मंजूर करवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हयातील शिक्षण विभागासह इतरही विभागातील रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे जातीने पाठपुरावा करण्यात येईल, असेही जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले आहे. तसेच जिल्हयातील महत्त्वाच्या असलेल्या प्रलंबित मुलभूत समस्या सोडवून जिल्हावासियांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अजय कंकडालवार यांनी म्हटले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-11


Related Photos