पाेलीस जवानांनी फक्त ५ मिनटात केला आलापल्ली - एटापल्ली रस्ता सुरळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात कार्यरत पोलिस जवान केवळ नक्षलविरोधी अभियान राबविण्यापुरतेच नाहीत तर इतरही कार्यात तेवढ्याच जबाबदारीने कार्य पार पाडतात. याचा प्रत्यय नेहमीच येत असतो. सामाजिक बांधिलकी जोपासत समाजहिताचे कार्य करणारे पोलिस जवान नागरिकांना कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागू नये यासाठी अहोरात्र धावून जातात, याचाच प्रत्यय आज आला असून चिंचेचे झाड पडून अडलेला रस्ता केवळ पाच मिनीटात सुरळीत केला आहे.
आलापल्ली - एटापल्ली  मार्गावर  असलेल्या येलचील गावात एक चिंचेचे  झाड सायंकाळी ६:३० वा दरम्यान रस्त्यावर पडले होते. यामुळे  रहदारीस अडथळा निर्माण झाला होता.  भर पावसात  येलचील येथील  नागरीक व पाेलीस मदत केंद्र येलचील येथील पाेलीस जवानांनी लगेच   रस्त्यावर पडलेल्या झाडाचे तुकडे करुन सदरचा आलापल्ली - एटापल्ली  जाणारा मार्ग ५ मिनटात सुरळीत केला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-11


Related Photos