गडचिरोलीचे आमदार डाॅ. देवराव होळी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा


- रुग्णांना फळवाटप, दिव्यांग विद्यार्थी व मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांचा वाढदिवस मंगळवार, १० डिसेंबर २०१९ रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रम आयोजित करुन उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आमदार डाॅ. देवराव होळी यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. तसेच गडचिरोली येथील इंदिरा गांधी चैकातील महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले, शहरानजीकच्या लांझेडा येथील मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना व शहरातील मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना आमदार डाॅ. देवराव होळी यांच्यासह गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, भाजपा आयटी सेलचे जिल्हा संयोजक अविनाश महाजन, भाजपा प्रशिक्षण सेलचे जिल्हाप्रमुख प्रशांत भृगुवार, पंचायत समिती उपाध्यक्ष विलास दशमुखे, नगरसेवक तथा भाजपा नेते प्रमोद पिपरे, नगरसेवक तथा भाजपा किसान आघाडीचे नेते रमेश भुरसे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक केशव निंबोळ, नगरसेविका अलका पोहणकर, भाजपा तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, सामाजिक कार्यकर्ते केशवराव दशमुखे, भाजप कार्यकर्ते श्रीकांत पतरंगे, झाडे, दुर्गा मंगर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-10


Related Photos