धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत जाहिर


- शेतकऱ्यांना २०१९-२० मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
गौरव नागपूरकर / देसाईगंज :
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. सन २०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.
सत्तास्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी मदतीची घोषणा न झाल्याने शेतकरी हतबल झाले होते. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान पिकाच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा केली आहे. 
शेतऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रूपयांची मदत मिळणार आहे. यामुळे कोकण आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा फायदा होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना याद्वारे दिलासा मिळणार असला तरी इतर शेतकऱ्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील उर्वरित शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-10


Related Photos