आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सैनिकी शाळेत मिळणार मुलींना प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्‍ह्यात नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावीकरिता प्रवेश देण्‍याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्‍याचा हा निर्णय देशातील फक्‍त दोन शाळांकरिताच घेण्‍यात आला असून महाराष्‍ट्रात या सैनिकी शाळेसाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे. माजी अर्थमंत्री तथा बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या शाळेसाठी पुढाकार घेतला होता . पश्चिम दक्षिण भारतात या सैनिकी शाळेपासूनच मुलींच्या प्रवेशाास सुरुवात होत आहे. ही सैनिकी शाळा चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर विसापूर गावानजीक उभारण्‍यात आली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-08


Related Photos