वीज विभागाचा तोतया कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
‌प्रतिनिधी / नागपूर :
महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत विभागात काम करणारा खाजगी व्यक्ती महोदव नथ्थुजी गिल्लुरकर (४७) रा.  बुधवारपेठ वार्ड क्र. १, कोटगाव नाका, ता. उमरेड, जि. नागपुर यास ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, यातील तक्रारदार हे ईतवारी पेठ, उमरेड, जि. नागपुर येथील रहीवासी असुन त्यांचे उमरेड येथे अगरबत्तीचे दुकान आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे स्वतःचे घरी नवीन मिटर घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत कार्यालय उमरेड येथे ऑनलाईन अर्ज केला होता. त्याबाबत महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत कार्यालय उमरेड येथे काम करणारे महादेव गिल्लुरकर याने लोड टेस्टींगसाठी तक्रारदार यांचे घरी येवून घराची तपासणी करून तक्रारदार यांना महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगुन घरी मिटर लावायचा असेल तर ५ हजार रूपये द्यावे लागतील असे म्हणुन लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुरचे पोलीस निरिक्षक सारंग मिराषी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत उमरेड कार्यालयात काम करणारे महादेव गिल्लुरकर याच्याविरूध्द योजनाबध्दरित्या सापळा कारवाई चे आयोजन केले. त्यामध्ये ७ डिसेंबर २०१९ रोजी पडताळणी व सापळा कार्यवाही केली. त्यामध्ये महादेव गिल्लुरकर याने तक्रारदार यांच्याकडुन 5 हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने ईतवारी बाजार उमरेड येथे रंगेहात पकडलेे. त्याबाबत महादेव गिल्लुरकर याच्याविरूध्द पोलीस स्टेषन उमरेड, जि. नागपुर येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी मर्यादीत उमरेड कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.  
सदर कार्यवाही नागपूरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवारए पोलीस उपअधिक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्रीमती योगीता चाफले, पोलीस निरिक्षक सारंग मिराषी, पोहवा दिनेश शिवले, नापोशि रवि दहाट, पोशि मंगेष कळंबे, चापोहवा नरेंद्र चौधरी यांनी केलेली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-12-07


Related Photos