पोलिसांच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


- गौरीपूर नजीकच्या घोट वळणावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलिसांच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवार, ७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर नजीकच्या घोट वळणावर घडली. शंकर महारू आत्राम (३६) असे मृतकाचे नाव आहे. ते चामोर्शी येथील रहिवासी असून घोट नजीकच्या नवेगाव पेठ येथील शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. मृतक शिक्षक शंकर आत्राम हे आपल्या एमएच ३३ पी ४९३६ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने घोटकडे जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने (क्रमांक एमएच ३३/५६०) गौरीपूर जवळील घोट वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शंकर आत्राम हे जागीच ठार झाले. सदर घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल होवून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी वाहन चालक मनोहर तोगरवार (३६, प्राणहिता मुख्यालय) यास ताब्यात घेउन गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेेंद्र बोरकर हे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-07


Related Photos