महत्वाच्या बातम्या

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान २६ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनूसार 26 सप्टेंबर 2022 पासून (नवरात्री उत्सवापासून) 26 ऑक्टोबर 2022 या एक महिण्याच्या कालावधिकरीता माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली डीटीएफ सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोहिमेबाबत तालुकास्तरीय प्रशिक्षण व बीटीएफ सभा घेण्यात आली. 26 सप्टेंबर 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 या एक महिण्याच्या कालावधिकरीता जिल्हयातील आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवून 18 वर्षावरील सर्व महिलांची सर्वांगीन आरोग्य तपासणी करणे, आरोग्य विषयक चाचण्या करुन योग्य तो औषधोपचार करणे, गरज भासल्यास वरिष्ठस्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये संदर्भीत करणे, इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवावयाचे आहेत. गडचिरोली जिल्हयामध्ये सदर अभियानाचे उद्घाटन अशोक नेते, खासदार, गडचिरोली चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली 27 सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. 

सदर अभियानाच्या उद्घाटन समारंभास डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली, डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जि.प. गडचिरोली, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकिय अधिकारी, सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 26 सप्टेंबर 2022 पासून जिल्हयातील सर्व 18 वर्षावरील तसेच गरोदर माता यांची सर्वांगीन आरोग्य तपासणी करुन आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने दंत शिबीर, आर के एस के कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पोषण विषयी समुपदेशन कॅम्प, गर्भधारणापुर्व सेवा कार्यक्रम शिबीरे, मानव विकास शिबीरे, 30 वर्षावरील महिलांची असंसर्गजन्य आजाराबाबत तपासणी तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत महिलांची तपासणी करण्यात येत आहे. 26 सप्टेंबर 2022 ते 04 ऑक्टोबर 2022 या 9 दिवसांच्या कालावधिमध्ये 47 हजार 204 एवढया 18 वर्षावरील महिलांची तपासणी वैद्यकिय अधिकारी यांचेव्दारा करण्यात आलेली असून त्यामध्ये 8 हजार 232 गरोदर माता यांचा समोवश आहे तर 31 हजार 764 महिला हया 30 वर्षावरील आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos