जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाच्या ८ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी/ कुरखेडा :
उपविभाग कुरखेडा हद्दीतील जांभुळखेडा गावानजिक नक्षलवाद्यांनी १ मे २०१९ रोजी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये १ खाजगी वाहन चालकासहीत गडचिरोली पोलीस दलाचे १५ पोलीस जवान शहीद झाले होते. सदर घटनेनंतर पुराडा पोस्टे येथे अप. क्र.१९/२०१९ गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाने वेगाने तपास करत जहाल नक्षलवादी उप्पुगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का व तिचा पती सत्यनारायण ऊर्फ किरण यांच्यासहीत, दिलीप श्रीराम हिडामी, परसराम मनिराम तुलावी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सिताराम हिडामी, सकरु रामसाय गोटा, कैलास प्रेमचंद रामचंदानी अशा ८ मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळविले होते. यानंतर शासनाच्या आदेशान्वये गुन्हयाचा तपास हा NIA (National investigation agency) यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेल्या वरील नमुद सर्व आरोपींवर एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-06


Related Photos