लाहेरी-धोडराज मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलिसांनी केले निकामी


- नक्षल्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी लावला उधळून

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर घातपाताच्या उददेशाने नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले १५ किलो वजनाचे क्लेमोर माईन हे स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधून निकामी केले आहे. त्यामुळे नक्षल्यांचा घातपात करण्याचा डाव उधळल्या गेला असून पोलिसांच्या सतर्कमुळे मोठा धोका टळला आहे.
अबुझमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलातील जवानांनी २९ व ३० नोव्हेंबर २०१९ रोजी नक्षलवाद्यांचा प्रशिक्षण तळ उद्धवस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले होते. यावेळी मोठया प्रमाणात नक्षल साहित्य व दस्ताऐवज हस्तगत करण्यात आले होते. यावेळी मिळालेल्या दस्ताऐवजावरून ३ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलिस दलाने भामरागड उपविभागांतर्गत येणाारया लाहेरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले असता सदर रस्त्यावर नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने जमिनीत पुरून ठेवलेले अंदाजे १५ किलो वजनाचे क्लेमोर माईन स्फोटके आढळून आले. सदर ठिकाणी बाॅम्ब शोधक व नाशक पथक गडचिरोली यांची चमू तातडीने रवाना करण्यात आली. सदर चमूने क्लेमोर माईन घटनास्थळीच सुरक्षितरित्या निकामी करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला गेला आहे. याबाबत लाहेरी येथील उपपोलिस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ५/१९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करीत आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बाॅम्ब शोधक व नाशक पथकाचे सेच सर्चिंग करून क्लेमोर मोईन शोधून काढणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे. या दोन्ही पथकाला पारितोषिक सुद्धा घोषित केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-04


Related Photos