आता युएसबी कंडोम चा वापर करून धोका टाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  मुंबई :
कंडोम  म्हटलं की आपल्या समोर येतं ते अनिश्चित धोका. हा धोका फक्त शारिरीक नसून तर तो आपल्याला दररोजच्या वापरातही मिळू शकतो. याचकरता युएसबी कंडोम  चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून युएसबी कंडोम जगभरात लोकप्रिय होत चालला आहे.
याला कारण ही तसंच अगदी खास आहे.  आपण मोबाइल चार्ज करण्यासाठी अनेकदा युएसबी पोर्टचा वापर करतो. याच युएसबी  पोर्टमार्फत होणारा धोका टाळण्यासाठी युएसबी कंडोम  चा वापर करणे महत्वाच ठरणार आहे. युएसबी कंडोम किंवा युएसबी ब्लॉकर म्हणून याकडे पाहिलं जातं. 
ज्यावेळी तुम्ही मोबाईल किंवा टॅबलेट इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्जिंग करण्यासाठी वापरता तेव्हा युएसबी कंडोम तुमच्या उपकरणातील डाटा ट्रान्स्फर  ही सिस्टीम बंद करून टाकते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील अतिशय महत्वाच्या गोष्टी चोरी होण्यापासून रोखणार आहेत. 
महत्वाच म्हणजे या डिवाइसची किंमत ही जवळपास ५०० रुपयांपर्यंत असणार आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे PortaPow युएसबी डाटा ब्लॉकर . हे उपकरण तुमचा मोबाईल चार्जिंगला लावल्यावर फक्त चार्जिंगच करणार. त्यामधून इतर कोणत्याही गोष्टींची चोरी होत नाही. 
अनेकदा मोबाइल चार्जिंगला लावताना युएसबी चा वापर केल्यास तुमच्या मोबाईलमधील अत्यंत महत्वाचे पासवर्ड, महत्वाचे ऍप चोरी होण्यापासून रोखलं जातं. युएसबी चार्जिंग स्कॅम पासून स्वतःचा मोबाईल वाचवण्यासाठी याची मागणी वाढत आहे. मध्यंतरी ‘Juice Jacking’ नावाचा प्रकार सुरू झाला होता. त्यात तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला की तो हॅक केला जाऊ शकत होता.
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना प्रत्येकाने या युएसबी कंडोम चा वापर करायला हवा. कारण अशा ठिकाणी अनेकदा महत्वाच्या गोष्टी चोरी होण्याची शक्यता असते. यामध्ये बँकेचे किंवा इतर पासवर्डचा समावेश असतो.   Print


News - Rajy | Posted : 2019-12-04


Related Photos