महत्वाच्या बातम्या

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करिता पात्र ठरू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेत आंबा कलम, आंबा कलम सघन लागवड , पेरू कलम सघन लागवड , पेरू कलम, कागदी लिंबू कलम, सिताफळ कलम, आवळा कलम, चिंच कलम, जांभुळ कलम, फणस कलम व चिकु कलम फळ पिकांकरिता शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. अर्जना कडू यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos