जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एक जण जागीच ठार, खुदीरामपल्ली येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / मुलचेरा :
  शेतातील जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज ४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या  सुमारास मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे उघडकीस आली.जगबंधू जुगल सूत्रधार (२६) राहणार खुदीरामपल्ली असे मृतकाचे नाव आहे.
 आज सकाळी ७  वाजताच्या दरम्यान जगबंधू जुगल सूत्रधार आणि दुलाल मनोरंजन पाल हे दोघेजण जगबंधू सूत्रधार यांच्या कापसाच्या शेतात पाणी करण्यासाठी गेले होते.ऑइल इंजिनच्या साहाय्याने शेतात पाणी पुरवठा करणार होते.दुलाल पाल हे ऑईल इंजिन च्या दिशेने गेले तर जगबंधु सूत्रधार हे आपल्या शेतात असलेल्या बकेट आणायला जात होते. तारचे कुंपण ओलांडताना तिथेच अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला असावा आणि त्यामुळेच जगबंधु सूत्रधार याचा मृत्यू झाला असावा.असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरण विभागाचेही कर्मचारी उपस्थित झाले .
   या कापसाच्या शेतीला तारेचे कुंपण होते आणि या कुंपणाला जर वीज  प्रवाह सोडले असेल तर कोणी सोडले आणि का सोडले हे  चौकशीअंती बाहेर येणार आहे.मात्र,या तारेच्या कुंपणाला ईतर एक तार जोडून असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-04


Related Photos