येनापूर येथे आयसर वाहनासह १४ लाख १८ हजार रुपयांची दारू जप्त


- दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील श्री गणेश पेट्रोलपंपासमोर आयशर वाहनासह १४ लाख १८ हजार ६०० रुपयांची दारू २ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध आष्टी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अवैधरित्या दारूची वाहतूक करणारया व विक्री करणारयांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्हयात अवैध दारूची वाहतूक, विक्री आणि बाळगण्यास बंदी घातली असल्याने अवैध दारू विक्रेत्यांवर अंकूश बसावा याकरिता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गडचिरोली जिल्हयातील अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायावर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविलेली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक २ डिसेंबर २०१९ रोजी पोलिस स्टेशन चामोर्शी शहर परिसरात गस्तीवर असताना येनापूर येथील श्री गणेश पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या आयार वाहनांमध्ये अवैध वाहतुकीकरिता दारू भरून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) डाॅ. मोहितकुमार गर्ग, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलिस पथकाने येनापूर येथील श्री गणेश पेट्रोलपंपाच्या बाजुच्या शेतशिवारात सापळा रचून खबरेप्रमाणे आयसर चारचाकी वाहनाचा चालक वाहन चालू करुन निघत असताना पोलिस पथकाने त्यास थांबवून पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनाच्या तयार करण्यात आलेल्या खास चोर कप्यामध्ये वेगवेगळया विदेशी कंपनीचा मोठा दारू साठा आढळून आला. त्यामुळे वाहन चालक युसूफ अली रहमद अली सैयद रा. लखमापूर बोरी, ता. चामोर्शी यास सदर दारू साठयाबात व वाहन मालकाबाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल व वाहन ही चामोर्शी येथील दारू तस्कर धर्मा निमाई राॅय याचा असल्याचे सांगितल्याने अवैध दारू विक्री संबंधाने आयशर वाहनासह १४ लाख १८ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध आष्टी येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-03


Related Photos