नक्षलवाद्यांनी पुन्हा काढले डोकेवर


- दोन निष्पाप लोकांची हत्या करून मांडला उच्छांद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मुक्तेश्वर म्हशाखेत्री / गडचिरोली :
मागील काही दिवस शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपले डोकेवर काढत गडचिरोली जिल्हयात अनेक ठिकाणी हिंसक कारवाया घडवून आपल्या क्रूरतेचे दर्शन घडविले आहे. एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी येथील दोन निष्पाप आदिवासी बांधवांची 1 डिसेंबरच्या रात्री नक्षल्यांनी निर्घृणपणे हत्या करून उच्छांद मांडला आहे. तसेच पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी कमलापूर येथील हत्ती कॅम्पची तोडफोड करून मोठया प्रमाणात टुरिझम प्लेस व इतर साहित्याची नासधूश केली आहे. शिवाय भामरागड -आलापल्ली मार्गावरील तलवाडा गावाजवळील रस्त्यावर मोठमोडी झाडे तोडून टाकत मार्ग अडवित लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील महिन्यात चातगाव दलम कमांडरने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षिस असलेल्या कसनसूर दलम कमांडरसह ६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला. या घटनेचा वचपा काढणच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी आपले डोकेवर काढत १ डिसेंबरच्या रात्री गडचिरोली जिल्हयात विविध ठिकाणी कारवाया घडवित आपली दहशत निर्माण केली आहे. पोलिस विभागाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विकासाकरिता लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेच हिताचे असल्याची भावना आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलिस विभाग व प्रशासनाच्या सहकार्य आणि मदतीमुळे जनतेमध्ये प्रशासनाबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासी बांधव सुद्धा नक्षलवाद्यांना सहकार्य न करता प्रशासनाला व पोलिस विभागाला सहकार्य करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकशाही मार्गानेच आपला विकास शक्य असल्याची भावना चळवळीमध्ये सामिल झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये निर्माण झाल्याने मोठया संख्येने नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडून आत्मसमर्पण करीत लोकशाहीचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसत असून ही चळवळ खिळखिळ होऊ लागली आहे. त्यामुळे चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी लोकांमध्ये आपली दहशत कायम ठेवण्यासाठी पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवार, १ डिसेंबरच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी येथील दोन निष्पाप आदिवासी बांधचांची निर्घृणपणे हत्या केलेली आहे. तसेच टुरिझम प्लेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूर येथील हत्तीकॅम्पची तोडफोड करुन परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तसेच भामरागड -आलापल्ली मार्गावर झाडे तोडून टाकत वाहतूक व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. या हिंसक कारवायांमुळे नक्षलवाद्यांनी पुन्हा आपले डोकेवर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-03


Related Photos