नक्षलवाद्यांकडून कमलापूर येथील हत्ती कॅम्पची तोडफोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पची नक्षलवाद्यांनी तोडफोड करून मोठया प्रमाणात नुकसान केल्याची घटना रविवार, 1 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कमलापूर व परिसरात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. कमलापूर हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून जिल्हयातील व बाहेरील अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. दरम्यान, रविवारच्या रात्री नक्षल्यांनी या कॅम्पमधील अनेक टुरिझम प्लेसची तोडफोड केली आहे. या कॅम्पमधील अनेक वस्तुंची नासधूस केली आहे. या परिसरात अनेक ठिकाणी नक्षली बॅनर्स बांधण्यात आले असून नक्षल पत्रकेही टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून लोकांमध्ये तसेच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-02


Related Photos