नक्षलवाद्यांनी झाडे टाकून व बॅनर बांधून अडविला भामरागड-आलापल्ली मार्ग


- पीएलजीए सप्ताहानिमित्त नक्षल्यांनी पुकारला बंद, वाहतूक ठप्प

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड ते आलापल्ली मार्गावरील तलवाडा गावाजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी मोठमोठी झाडे तोडून टाकली व त्यावर बॅनर बांधून मार्ग अडविला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याने नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेमुळे परिसरात नक्षल्यांची दहशत पसरली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्षलवाद्यांकडून 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएलजीएचा 19 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी बंद पुकारुन हा बंद यशस्वी करण्याचे आव्हान केले आहे. या सप्ताहात अनुचित घटना घडविण्याच्या उद्देशाने भामरागड -आलापल्ली मार्गावरील आलापल्पलीपासून 18 ते 20 किमी अंतरावरील तलवाडा गावाजवळील रस्त्यावर नक्षल्यांनी सागवानाची 5 जे 6 मोठमोठी झाडे तोडून टाकली व त्यावर बॅनर्स बांधले आहेत. शिवाय परिसरात अनेक ठिकाणी नक्षल पत्रके लावून पीएलजीएचा वर्धापन दिवस साजरा करण्याचे नक्षलवाद्यांनी आव्हान केले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-02


Related Photos