जि. प. पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता गायकवाड अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा :
वर्धा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता सुनील श्रीराम गायकवाड (५२) यास ५० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारयांनी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार हे विक्रमशीला नगर वर्धा येथील रहिवासी असून व्यवसायाने खाजगी कंत्राटदार आहेत. ग्राम वडगाव (क) अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती पाणीटंचाई कार्यक्रम सन २०१८-२०१९ नुसार सार्वजनिक विहीर दुरुस्ती व बांधकामाचे प्राप्त कंत्राटाचे पूर्ण केलेल्या कामाचे मंजूर बिल प्राप्त असून सदर कामाचे मोजमाप पुस्तिकेत नोंद केल्याने त्यांचा मोबदला तसेच तक्रारदार यांना ग्रामपंचायत किन्ही येथील प्राप्त कंत्राटाद्वारे त्यांनी पूर्ण केलेल्या पाईपलाईन्च्या कामाची नोंद मोजमाप पुस्तिकेत करण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग जिल्हा परिषद वर्धा येथील शाखा अभियंता सुनील गायकवाड यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास १ लाख ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार याची शाखा अभियंता सुनील गायकवाड यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून शाखा अभियंता अधिकारी याच्याविरूद्ध योजनाबद्धरित्या ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सापळा कारवाईचे आयोजन केले. दरम्यान, शाखा अभियंता सुनील गायकवाड याने तक्रारदाराच्या सार्वजनिक विहीर दुरुस्ती व बांधकामाचे प्राप्त कंत्राटाचे पूर्ण केलेल्या कामाचे मंजूर बिल प्राप्त असून सदर कामाचे मोजमाप पुस्तिकेत नोंद केल्याने त्याचा मोबदला तसेच तक्रारदारास ग्रामपंचायत किन्ही येथील प्राप्त कंत्राटादवारे त्यांनी पूर्ण केलेल्या पाईपलाईन्च्या कामाची नोंद मोजमाप पुस्तिकेत करण्याकरिता तडजोडअंती १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. शाखा अभियंता सुनील गायकवाड याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन वर्धा येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गजानन विखे, पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सहायक फौजदार रवींद्र बावनरे, पोलिस हवालदार संतोष बावनकुळे, नाईक पोलिस काॅन्स्टेबल रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, पोलिस काॅन्स्टेबल सागर भोसले, नाईक पोलिस काॅन्स्टेबल प्रशांत वैद्य, पोलिस काॅन्स्टेबल प्रदीप कुचनकर, महिला नाईक पोलिस काॅन्स्टेबल पल्लवी बोबडे, महिला पोलिस काॅन्स्टेबल स्मिता भगत, पोलिस काॅन्स्टेबल कैलास वालदे, चालक पोलिस काॅन्स्टेबल निशांत कुटेमाटे यांनी केली आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-12-01


Related Photos