महत्वाच्या बातम्या

 राज्य शासकीय निवृत्तीवेतन कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील ज्या राज्य शासकिय निवृत्ती वेतन धारक/कुटूंब निवृत्ती वेतन धारकांना जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली, मार्फत सुरु असलेल्या आपल्या निवृत्ती वेतनबाबत काही शंका किंवा अडचणी आहेत असे निवृत्ती वेतन धारक तसेच जिल्हा/तालुका स्तरीय निवृत्ती वेतन धारक संघटनेचे पदाधिकारी यांचा मेळावा 13 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 11.30 वाजता,जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांनी सदर मेळाव्याचा लाभ घेऊन शंका समाधान करुन घ्यावे असे जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos