कोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : 
येथील सीताबाई हिळामी याच्या शेतातील धान्याचे पुंजने अज्ञात लोकांनी जाळून टाकल्याचे संशय असुन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी ला सायंकाळी  ६ वाजताच्या सुमारास  पुंजने जळाल्याची  माहिती गावकऱ्यांना  मिळाल्यानंतर  गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. आग सर्वत्र पसरल्यामुडे आग आटोक्यात आणणे  खुप अवघड होते. शेतमालक सीताबाई हिडामी या शेतकर्‍यांने आपल्या १५ एकर शेतामध्ये आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवून पेरणी केली होती डोक्यावर कर्जाचे ओझे, धानाची फसल काढुन भरायची अशी कल्पना डोक्यात सतावत होती. राब राब राबुन शेवटी पीकाची कापनी करून सांयकाडी ५ वाजता पुंजने ठेऊन घरी गेले असता अचानक पुंजन्याला आग लागल्याची बातमी पसरताच लोकानी शेताकड़े धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत खुप उशीर झाला होता.
कोरची तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे  तहसिलदार सी़. आर भंडारी, एपीआय गोडबोले व  तलाठी यांनी  घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे  निर्देश दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे तहसिलदार भंडारी यानी सांगीतले. सर्व शेतकऱ्यांनी आपापले पुंजने सुरक्षित असल्याचे खात्रीलायक जागी ठेवण्याची गरज आहे व असे काही आढळून आले तर ताबडतोब पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावे किवा माहिती  देण्यात यावी असे आवाहन तहसीलदार यांच्या द्वारे करण्यात आले . नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-30


Related Photos