मसेली येथील गावकऱ्यांनी वाहन अडवून पकडले 1 लाख 92 हजार रुपये किंमतीची देशी दारू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची :
कोरची तालुक्यातील ग्रामीण भागातील धानाच्या पुंजन्यांना आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारच्या रात्री मसेली येथील नागरिक पुंजन्याची जागल करीत असताना महिंद्रा झायलो चारचाकी वाहन (क्र. एम. एच. १२  एफ. के. २०२९) येताना दिसले. वाहनातील व्यक्ती आग लावण्यासाठी येत असावे असा संशय शेतकऱ्यांना आल्याने शेतकऱ्यांनी वाहन अडवून तपासणी केली. यात १ लाख ९२ हजार रुपये किंमतीची देशी दारु व ३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरची तालुक्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मसेली येथील शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास गस्त घालून दारूची वाहन अडवून जप्त करुन कोरची पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. यावेळी चारचाकी वाहकाने मसेली येथील नागरिकांना आम्ही पुजन्यांना आग लावणारे नसल्याचे सांगितले. यानंतर वाहनाची तपासणी केली असताना देशी दारूचे बॉक्स आढळून आले होते. लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर कोरची पोलिसांनी यावर ५७/१९ कलम ६५ अ ९८ मदाकानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करून वाहन जप्त केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-30


Related Photos