जयरामपूर येथील रेतीघाटावरून सात हायवा ट्रकसह तीन पोकलॅन्ड मशीन जप्त


- आष्टी पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई

- रेती तस्करांचे दणाणले धाबे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील लीलाव झालेल्या रेतीघाटावर काही इसम मोठया प्रमाणात पोकलॅन्डचा वापर करुन नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास जयरामपूरवरुन घाटकूळ -पोंभुर्णामार्गे चंद्रपूरला भरुन जात असताना आष्टी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मडावी, एच. सी. किरमिरवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक फुलझेले, एच. आर. वैरागडे, पचफुलवार, शैलेश मुठाई यांना जयरामपूरचे तलाठी एल. एस. होळी यांना सोबत घेउन सदर रेतीघाटावर धाड टाकण्यासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, सदर नदीपात्रात दोन पोकलॅन्ड मशीनद्वारे रेती उत्खनन करुन हायवा गाडीत भरताना आढळून आले. सदर ठिकाणची अधिक पाहणी केली असता अजून एक पोकलॅन्ड नदीकाठी झुडुपात लपवून ठेवण्यात आला होता. यावेळी तीन पोकलॅन्ड व सात हायवा वाहन (क्रमांक एमएच 34 बी. जी. 6433, एमएच 34 एम 6233, एमएच 34 बी. जी. 6242, एमएच 34 बी. जी. 2212, एमएच 34 बी. जी. 2213, एमएच 34 ए. बी. 3899, एमएच 34 बी. जी. 2216) ताब्यात घेतले. रेतीघाटाचे मालक हसन वाढई यांचे व्यवस्थापक शहारुख इजराईल शेख 32, रा. संजयनगर, चंद्रपूर व चालक प्रशांत बालाजी झरकर, अन्सर अमजरखान पठाण, अंकुश अशोक सोनटक्के, रमेश सत्यवान पोटे, श्यामराव पोचम, प्रशांत पंढरी रामटेके, गणेश श्यामराव लेनगुरे सर्व रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले. सदर पोकलॅन्ड मशीन लवकूश बांगरे, रा. बोंडाळा, ता. मूल, बालाजी व्यंकटी गायकवाड, रा. रुपावार, ता. गादीगुडा तेलंगाणा राज्य, खान चंद्रपूर यांच्या मालकीच्या असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे निरीक्षक आर. आय. राऊत व तलाठी नाईक हे गेले असून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या कारवाईमुळे रेतीची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-29


Related Photos