१२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणीबाबत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सन २०१९ -२०या शैक्षणिक सत्रात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहित नमुन्यात (Online) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे सादर करण्याकरीता मुदत देण्यात आलेली होती. त्याबाबतची नोटीस संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना पूर्वीच देण्यात आलेले आहे तसेच वर्तमान पत्राद्वारेही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रस्ताव सादर केलेले नाही. अशा अर्जदारांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतीत अर्ज सादर न केल्यास या नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे गडचिरोली  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राजेश शा.पांडे यांनी कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-28


Related Photos