महत्वाच्या बातम्या

 खरीप हंगाम सन २०२२-२३ ची हंगामी पीक पैसेवारी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात एकूण 1689 गावे असून,खरीप पिकाची गावे 1548 आहेत. व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 08 आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 45 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले खरीप गावे 0 असून,50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1511 आहेत. अशा प्रकारे एकूण 1511 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्हयाची खरीप हंगाम 2022-23 या वर्षाची हंगामी पैसेवारी 0.68 आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos