आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोलीचे पालकत्व दिल्यास जिल्हयाच्या विकासाला चालना मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोली जिल्हयाचे पालकत्व दिल्यास या जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शिवाय त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे जिल्हयातील प्रलंबित समस्या मार्गी लागतील. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते व गडचिरोली जिल्हावासियांकडून जोर धरत आहे.
धर्मरावबाबा आत्राम हे यापूर्वी तीनदा आमदार राहिले असून यावेळेस ते चवथ्यांदा आमदार म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. यापूर्वी ते दोनदा राज्यमंत्री राहिले असून एकदा पालकमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांना राजकीय घडामोडीचा व मंत्रिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांना गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री पद दिल्यास जिल्हयाच्या विकासाला गती मिळेल. त्यांच्या अनुभवामुळे जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हयाला मोठया प्रमाणात निधी मिळू शकतो. जिल्हयातील वंचित, अविकसित व गोरगरिबांच्या समस्या, मुलभूत प्रश्ने प्राधान्याने सुटू शकतात. शिवाय जिल्हयातील प्रलंबित असलेले प्रकल्प व समस्या मार्गी लागण्यास मोलाची मदत होणार असल्याचे दिसून येत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना जिल्हयातील राजकारणाचा, कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यापूर्वी त्यांनी विविध पदांची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना यावेळेस गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपविल्यास जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. धर्मरावबाबा आत्राम हे अनुभवी राजकारणी असून त्यांना जिल्हयाच्या कामकाजाची बरीच माहिती आहे. त्यामुळे जिल्हयाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी ते खेचून आणू शकतात. त्याकरिता माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली जिल्हयाचे पालकत्व देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्ते व जिल्हावासियांकडून जोर धरत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-27


Related Photos