मुलानेच केला जन्मदात्याचा खून, आरोपी मुलास पोलिसांनी केली अटक


- मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना आले यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मुलानेच जन्मदात्या वडिलाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून या प्रकरणी आरोपी मुलास पोलिसांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री अटक केली आहे. पोलिस कर्मचारी मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर असे की, 23 नोव्हेंबर 2019 रोजी सुखदेव महादेव सोनुने 54 रा. पोलिस वसाहत, तुकूम चंद्रपूर यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत असलेल्या स्थितीत त्यांच्या राहत्या घरात त्यांची पत्नी व मुलास दिसून आल्याने मृतकाची पत्नीने दिलेल्या प्राथमिक माहितीवरुन रामनगर पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्युची नोंद करुन तत्काळ तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करीत असतानाच प्राप्त वैद्यकीय अहवाल व मृतकाचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने 24 यास विचारपूस केली असता त्याच्या बोलण्यामध्ये पोलिसांना एकवाक्यता दिसून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढल्याने सखोल तपास करुन विचारपूस केली असता 23 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता वडील व मुलामध्ये शाब्दीक वाद झाल्याने त्या वादाच्या रागातून मुलगा तुषार याने वडील सुखदेव सोनुने यांना लोखंडी राॅडने ठार माले असे तपासात निष्पन्न झाले. मृतकाचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने याच्याविरुद्ध अपराध क्रमांक 1451/2019 कलम 302, 201 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-27


Related Photos