टाटा इंडिगो कारसह ५ लाखांचा दारूसाठा जप्त, एका आरोपीला अटक


- चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम एका टाटा इंडिगो वाहनाने रहेमतनगरकडून बिनबा गटकडे दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाॅलिटेक्नीक काॅलेजजवळ 24 नोव्हेंबर 2019 रोजी नाकेबंदी लावून 2 लाख रुपये किंमतीची देशी दारू व 3 लाख रुपये किंमतीची टाटा इंडिगो कार असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाॅलिटेक्नीक काॅलेज जवळ नाकेबंदी लावली. दरम्यान, टाटा इंडिगो वाहन येताना दिसले असता सदर वाहनास थांबवून वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात 2 लाख रुपये किंमतीच्या 5 प्लाॅस्टिकच्या पिशव्यात 2 हजार नग देशी दारूच्या बाॅटल व दारू वाहतुकीकरिता वापरलेले 3 लाख रुपये किंमतीचे टाटा इंडिगो वाहन क्र. एमएच 26 एल 2220 असा एकूण 5 लाख रुपये किंमतीचा दारू साठा जप्त केला.  यावेळी अब्दुल मोबिन उर्फ शहजाद अब्दुल मुत्तलिब (23), रा. अमरावती यास अटक करण्यात आली असून पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार पंडित वऱ्हाडे, पोलिस हवालदार सुरेश केमेकर, पोलिस नाईक संजय आतकुलवार, अनुप डांगे, पोलिस शिपाई नितीन रायपुरे यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-27


Related Photos