अखेर देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेतून आपण राजीनामा देत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. मी राज्यपालांकडे  जाऊन राजीनामा देणार असल्याचं फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता फडणवीसांनीहि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, उद्या भाजपला बहुमत सिद्ध करायचं आहे. पण बहुमत नसल्याने आधीच सावध पवित्रा घेत फडणवीसांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अजिप पवार हे ५४ आमदारांचा पाठिंबा भाजपला देणार होते. पण त्यांनीच राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप उडाला आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच अजित पवार यांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.
भाजपला उद्या बहुमताचा आकडा सिद्ध करायचा असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो पण एनडीएकडे बहुमत नसल्याचा दावा रामदार आठवले यांनी केला आहे. पण अजित पवारांच्या मदतीने आणि त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याने आम्ही बहुमत सिद्ध करू असं रामदास आठवले म्हटले आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-26


Related Photos