सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची तातडीने बोलावली बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.
उद्याच बहुमत चाचणी घण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर भाजपने तात्काळ कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी आता फक्त ३० तास उरले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र त्यांच्यासमोर आता बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, आज रात्री ९ वाजता देवेंद्र फडणवीसांनी सर्व भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-26


Related Photos