चार दिवसा पूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला छिन्न विच्छिन्न अवस्थेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
अँकर-बल्लारपूर पोलीस ठाण्यात चार दिवसाअगोदर दादाभाई वॉर्ड  येथिल रहिवासी अस्लम शेख गेधू मिया शेख उर्फ अस्लम भाई (५०) वर्षे हे अचानक हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती .  अस्लम शेख गेधू मिया शेख उर्फ अस्लम भाई  हे शुक्रवारी सायंकाळी ८ वाजताच्या  सुमारास  विसापूर येथून आपल्या दुचाकीने बल्लारपूर ला आपल्या घरी निघाले होते मात्र  नंतर ते  पुन्हा घरी परतलेच  नाही. 
आज सोमवारी सकाळच्या  सुमारास काही नागरिकांना  बल्लारपूर- विसापूर रोड वरील पेपर मिल मागील भागात एका खोल नालीत त्यांचा  मृतदेह  छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला असता नागरिकांनी पोलिसांना सदर माहिती देताच घटनास्थळी पोहचली व मृत्यूदेह शवविच्छेदन करण्याकरिता पाठवले. 
सदर इसमाची धारदार शस्त्रांनी  व दगडांनी ठेचून  हत्या केली असावी असा तर्क लावल्या जात आहे. दरम्यान त्याच्या मोबाईल चे शेवटचे लोकेशन धोपटला कॉलरी परिसरात दाखविल्याचे बोलले जात असून, त्याची दुचाकीही अद्याप पोलिसांना मिळाली नाही. महत्वाचे म्हणजे असलंम हा विसापूर येथे सट्टा चालवायचा. तो विसापूर येथून निघाल्यावर घरी न परतल्याने घर परिवार व  मित्रानी गेल्या चार दिवसा पासून परिसरात सगळीकडे शोध घेतला होता पण त्याचा मृतदेह आज बल्लारपूर- विसापूर रोड वरील पेपर मिल मागील भागात एका खोल नालीत आढळून आल्याने खळबळ उडाली . दरम्यान शवविच्छेदन अहवाला आल्यानंतर बऱ्याच बाबी स्पष्ट होणार असून बल्लारपूर पोलिसांसमोर या  हत्येचा  उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-25


Related Photos