घरगुती वादावरून सख्या भावाला मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा


- सत्र न्यायाधीश भेंडे यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
घरगुती कारणावरून सख्या भावाला आणि पुतण्याला मारहाण करून जखमी करणारया आरोपीस 22 नोव्हेंबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्हयातील वरोरा येथील सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांना शिक्षा ठोठावली आहे. पोलिस स्टेशन भद्रावती अंतर्गत येणाऱ्या काटवल तुकूम येथील रहिवासी फिर्यादी मनोहर कवडू गजभिये 38 आणि यातील आरोपी नथ्थु कवडू गजभिये 41 हे दोघेही नात्याने सख्ये भाऊ असून 31 जुलै 2010 रोजी फिर्यादी हे त्याच्या वडिलाच्या नावाने असलेल्या जमिनीचे कागदपत्र काही कामासाठी आरोपीकडून मागितले असता आरोपीने ते दिले नाही. या विषयावरून वाद घालून फिर्यादीसोबत झगडा, भांडण करून आरोपीने फिर्यादीला दगड फेकून मारले व कुरहाडीने डोक्यावर मारून गंभीररित्या जखमी करुन जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची पत्नी आणि मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीच्या मुलाच्या हातावर सुरीने वार करून जखमी केले. अशा फिर्यादीच्या आणि वै़द्यकीय अहवालावरून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक 181/2010 कलम 307, 451, 323 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयातील आरोपींविरुदध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे 22 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपी नथ्थू कवडू गजभिये 41 काटवल, भद्रावती यास भादंविच्या कलम 327 अन्चये 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 महिन्याची शिक्षा सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे चंद्रपूर येथील सरकारी अभियोक्ता ॲड. मिलिंद देशपांडे आणि कोर्ट पैरवी म्हणून भद्रावती पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार दिलीप पोहाणे यांनी काम पाहिले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-23


Related Photos