आगामी काळात शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीजपुरवठा


- गोंदिया जिल्हयातील शेततळयावर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया  :
  जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या  शेतात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजीत कार्यक्रमात दिली.
 महावितरणच्या  तिरोडा येथील पांजरा, अर्जुनी मोरगाव येथील महागाव, गोरेगाव येथील मोहाडी, गोंदिया येथिल काटी या ५ उपकेंद्राचे ई-लोकार्पण  तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाण, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भुमीपुजन प्रसंगी बोलतांना ना. बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रतिक्षा यादीत असलेल्यांच्या शेतात रोहित्रासकट शेतीपंपाची वीजजोडणी मिळणार असल्याने कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे, सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतक-याला आगामी काळात सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे  तसेच, धानपिकासाठी  जिल्हयातील शेततळयावर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणाही उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
 गोरेगाव रोडवरील लक्की लॉन्स़ येथे आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमात्री ना. राजकुमार बडोले  होते. व्यासपीठावर आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगाडाले, आ. संजय पुराम, गोंदिया नगर परिषदचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरवसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अलताफ हमीद उपस्तित होते.
 यावेळी बोलतांना ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त़ झाला असुन याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट़ केले.
 ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. परिणामी दिर्घ काळ वीज ग्राहकांना अंधारात रहावे लागते. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्राम पंचायती मध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  जिल्हयातील २२२ ग्राम पंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती उर्जामंत्री बावनकुळे यांनी उपस्थितांनी दिली.
जिल्हयात वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी सोबतच देयकांच्या संदर्भातील तक्रारी वीज ग्राहकांकडुन प्राप्त़ झाल्या आहेत. स्थानिक अधिका-यांनी यात लक्ष घालुन त्या दुर कराव्यात असे ना. बावनकुळे यांनी सांगीतले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, आ.गोपालदास अग्रवाल ,  आ. विजय रहांगाडाले, आ. संजय पुराम, यांनी आपले मनोगत व्यक्त़ केले.  महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य़ अभियंता सुखदेव शेरकर यांनी प्रास्तावीक तर संचालन  मनिषा दुबे व  के. कोकणे यांनी केले.

   Print


News - Gondia | Posted : 2018-09-16


Related Photos