झारखंडमध्ये नक्षली हल्ल्या : तीन जवान शहीद तर एकजण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रांची :
झारखंडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच काल शुक्रवारी १५  ते २०  नक्षल्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला. यात तीन पोलीस शहीद झाले, तर एक पोलीस गंभीर जखमी झाला. लातेहार जिह्यातील चांदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. नक्षलकाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. पुरेसे बळ नसल्यामुळे पोलीस या हल्ल्याचा प्रतिकार करू शकले नाहीत.
नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये जवळपास अर्धा तास चकमक झाली. नंतर अंधाराचा फायदा घेऊन नक्षलवादी पसार झाले. शहीद झालेल्या पोलिसांत उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी सुकिया उराक यांचा समावेश आहे. निवडणुकांसाठी बंदोबस्त वाढवला असतानाही नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरून गेल्या आहेत.  Print


News - World | Posted : 2019-11-23


Related Photos