नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी संदीप जोशी यांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. संदीप जोशी यांना १०४ मते मिळाली आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत मतदान घेण्यात आले होते. यात संदीप जोशी यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना २६ तर बसपाच्या मोहम्मद इब्राहिम तोहफीक  यांना १० मते मिळाली आहेत. बाल्या बोरकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीस अनुपस्थित राहिले. तसेच काँग्रेसचे निषाद मुमताज, बंटी शेळके, गार्गी चोप्रा व रश्मी धुर्वे अनुपस्थित होते. याखेरीज शिवसेनेचे किशोर कुमेरिया, अपक्ष आभा पांडे अनुपस्थित राहिले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-11-22


Related Photos