ईडीला चिदंबरम यांच्या चौकशीची परवानगी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी दिल्ली न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली. ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायमूर्ती अजय कुमार कुहार यांनी ही परवानगी दिली.
आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना काही कागदपत्रे दाखवून चौकशी करायची असल्याने तशी परवानगी देण्याची विनंती ईडीने न्यायालयाला याचिकेद्वारे केली होती. न्यायालयाने परवानगी दिल्याने ईडी २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन चौकशी करू शकणार आहे. या दोन दिवशी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ईडी चिदंबरम यांची चौकशी करणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-22


Related Photos