१ लाख २० हजार टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं दिली मंजूरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
एक लाख वीस हजार टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं आहे. कांद्याचे चढे भाव नियंत्रणात ठेवून स्थानिक बाजारापेठांमधील कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी एमएमटीसीच्या माध्यमातून सरकार १ लाख टन कांदा आयात करणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून ४ हजार टन कांदा आयात करण्यासाठीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भारत पेट्रोलियमसह पाच सार्वजनिक कंपन्यांमधील आपला हिस्सा केंद्र सरकार ५१ टक्क्यांपेक्षा कमी करणार आहे. सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या निर्गुंतवणूकीला आर्थिक व्यवहार केंद्रीय समितीने मंजूरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
२०१५ पासून सार्वजनिक कंपन्यामधील आपला हिस्सा कमी करुन सार्वजनिक क्षेत्रांना आणि विकास कामांना अर्थपुरवठा करण्यासाठी सरकार निधी उभा करत आहे. भारत पेट्रोलियमसह शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडिया, नॉर्थ इस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांमधील हिस्सा सरकार कमी करणार आहे.
  Print


News - World | Posted : 2019-11-21


Related Photos