गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव


- राज्यातील ३४ जि. प. च्या अध्यक्ष पदाची सोडत जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाली आहे. यात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यापूर्वी ओबीसी महिला प्रवर्गासाठी हे पद राखीव होते. त्याआधी २७ महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची सोडत जाहीर होती. आता जिल्हा परिषदेची सोडत जाहीर झाल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने अनेक ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागात जिल्ह्या परिषदेत सत्ता कोण राखतो याची उत्सुकता आहे. त्यामुळे नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणानुसार काही ठिकाणी जिल्हा परिषदेत वेगळी समिकरणे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड : नागरिकांचा मागास प्रवर्ग - ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला),  रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा : खुला (सर्वसाधारण), जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर  : खुला (महिला), सोलापूर, जालना : अनुसूचित जाती (सर्वसाधारण). नागपूर, उस्मानाबाद : अनुसूचित जाती (महिला), नंदुरबार, हिंगोली : अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), पालघर, रायगड, नांदेड : अनुसूचित जमाती (महिला), लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-19


Related Photos