देसाईगंज येथे वाहनासह 8 लाखांची दारू जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
भंडारा जिल्हयातील लाखांदूर येथून दारूची चोरट्या मार्गाने आयात करताना देसाईगंज शहरातील रेल्वेलाईनच्या बोगद्याजवळ चारचाकी वाहनासह 7 लाख 98 हजार 400 रूपयांची देशी व विदेशी दारू 18 नोव्हेंबर 2019 रोजी जप्त केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखांदूरवरुन देसाईगंज मार्गाने गडचिरोलीकडे एका चारचाकी वाहनाने 18 नोव्हेंबर रोजी अवैद्यरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरुन कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे, चालक पोलिस हवालदार देवानंद तोडासे,  पोलिस नाईक सदाशिव धांडे, चालक पोलिस नाईक शंकर बंडे, पोलिस शिपाई गणेश बहेटवार यांनी 18 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 11.48 वाजताच्या दरम्यान देसाईगंज येथून रवाना होवून देसाईगंज शहरातील रेल्वेलाईनच्या बोगद्याजवळ जावून पाळत ठेवली. दरम्यान, एक चारचाकी वाहन बोगद्यामधून येताना दिसल्याने त्यास थांबवून हुंडाई वरना कंपनीची सिल्व्हर रंगाच्या एमएच 01 एएक्स 6935 या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या राॅकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या 3200 सिलबंद प्लाॅस्टिक बाॅटल, 28 हजार 800 रुपये किंमतीच्या इंपेरियल ब्ल्यु कंपनीच्या 180 मिली मापाच्या 96 काचेच्या बाॅटल, 9 हजार 600 रुपये किंमतीच्या हायवर्ड बियर 500 मिली मापाच्या टिनाच्या 48 बाॅटल व 6 लाख रुपये किंमतनीचे वाहन असा एकूण 7 लाख 98 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश देवेंद्रसिंह राठोड (27) अंतरगाव, ता. लाखांदूर, जि. भंडारा व सौरभ विठ्ठल बोरकर (19) रा. लाखांदूर वाॅर्ड क्रमांक 4, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन देसाईगंज येथे अपराध क्रमांक 0359/2019 कलम 65 (अ), 83 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे, चालक पोलिस हवालदार देवानंद तोडासे, पोलिस नाईक सदाशिव धांडे, चालक पोलिस नाईक शंकर बंडे, पोलिस शिपाई गणेश बहेटवार यांनी केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पुढील तपास पोलिस हवालदार यादवराव भोयर, पोलिस नाईक प्रभु जनबंधू हे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-19


Related Photos