मराठा आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली सुनावणी ; जानेवारीत होणार सुनावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली आहे. या याचिकांवर आता जानेवारी २०२० मध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी, तसंच राज्यात आरक्षणासाठी मोर्चे काढल्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टानंही सरकारचा निर्णय कायम ठेवला आणि आरक्षण वैध ठरवले होते. मराठा आरक्षण वैध ठरवणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला याचिकांद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देताना सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत लागू केलेल्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. मराठा आरक्षण वैध ठरवणाऱ्या या निर्णयाविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज, मंगळवारी सुनावणी होती. कोर्टानं या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. जानेवारी २०२० मध्ये या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात येणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-11-19


Related Photos