आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेने 3 महिन्यांपासून बंद असलेले इरई धरण मच्छीमारांसाठी सुरू


- 150 मच्छीमारांचा व्यवसाय पूर्ववत सुरू

- मच्छीमारांनी मानले जोरगेवारांचे आभार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
इरई धरणातील मच्छीमारीचे काम एका संस्थेला देण्यात आल्याने मागील 3 महिन्यांपासून इरई धरणातील मच्छीमारी बंद करण्यात आली होती. त्यामुळे 150 मच्छीमारांचा रोजगार हिरावल्या गेल्या होता. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधीत कंत्राटदाराला येथील मच्छीमारी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा सूचना केल्यानंतर हे धरण पुन्हा मच्छीमारीकरीता सुरु झाले असून 150 मच्छीमारांचा रोजगार बचावला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मिठाई वाटप करत आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरातील इरई धरण येथे मच्छीमारी केल्या जात आहे. येथे मच्छीमारी करणारे मच्छीमार नियमाप्रमाणे कर अदा करुन येथे मच्छीमारी करीत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी हे धरण मत्स्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूर यांना देण्यात आले. त्यामुळे या सोसायटीने मासोळ्यांची बिजाई टाकण्याचे कारण सांगत मच्छीमारी बंद केली. मात्र तिन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे धरण मंच्छीमारांसाठी सुरू करण्यात न आल्याने येथे मच्छीमारी करत असलेल्या 150 नोंदनीकृत मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली. दरम्यान, या मच्छीमारांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. जोरगेवार यांनी तत्काळ संबधीत संस्थेच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणावर मध्यस्ती केली. यावेळी मच्छीमार व या संस्थेच्या अडचणी समजून घेत त्यावर तोडगा काढत  हे धरण पुन्हा मच्छीमारीकरीता सूरु करण्यात यावे, अशा सुचना केल्यात. त्यामुळे तीन महिण्यांपासून मच्छीमारीकरीता बंद असलेले इरई धरण मच्छीमारीसाठी सुरु करण्यात आले आहे. येथे मच्छीमारी करुन 150 कुटुंब आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र तीन महिण्यांपासून त्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. मात्र जोरगेवारांच्या मध्यस्तीनंतर तीन महिण्यांपासून बंद असलेले इरई धरन मच्छीमारीकरीता 2 तासात सुरु झाल्याने मच्छीमारांनी मिठाई वाटप करित आपला आनंद व्यक्त केला. तसेच आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. यावेळी रोजगार करुन परिवाराचे पालनपोषण करत असलेल्यांनी स्वाभिमानाने जगावे, असे सांगत त्यांच्या रोजगाराला कोणतीही अडचण आल्यास मी ती खपवून घेणार नाही, असेही यावेळी जोरगेवार यांनी ठणकावून सांगितले आहे. यावेळी मत्स्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूरचे अध्यक्ष पी. आर. गेडाम, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, विश्वजीत शहा यांच्यासह शेकडो मच्छीमारांची उपस्थिती होती.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-18


Related Photos