गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात पलटला ट्रक


- काहीकाळ वाहतूक व्यवस्था झाली विस्कळीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील इंदिरा गांधी चौकापासून जवळच असलेल्या आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीसमोर एम. एच. 33 जी 2092 या क्रमांकाचा ट्रक सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान पलटला. या अपघातात सुर्दैवाने कुणालाही दुखापत झाली नसली तरी या अपघातामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. आरमोरी मार्गावरुन गडचिरोलीकडे भरधाव वेगाने येणारया ट्रकवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्थानिक इंदिरा गांधी चौकापासून जवळच असलेल्या आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीसमोरील रस्ता दुभाजकावर ट्रक आदळून पलटला. या अपघातात सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नसली तरी काहीकाळ वाहतूक ठप्प झाल्याने अनेकांना काहीकाळ त्रास सहन करावा लागला.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-18


Related Photos