जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ आवश्यक : गंगाधर कुकडकर


- ठाणेगाव येथील टम्पर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
मानवी जीवनात सुदृढ राहायचे असेल तर खेळणे आवश्यक आहे, से प्रतिपादन ठाणेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक गंगाधर कुकडकर यांनी केले. ठाणेगाव येथे टी. पी. एल. क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टम्पर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन निताताई मडावी सरपंच ठाणेगाव यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लालाजी कुकडकर उपसरपंच ठाणेगाव, रंजना नारदेलवार सरपंच डोंगरगाव, महेश किरमे, हिरामण चापले, रामेश्वर चिचघरे, मिथुन धोडरे, रामेश्वर भुरसे, गिरीधर कुनघाडकर, घनश्याम मेश्राम, राजू नैताम, गोविंदा चापले, निखिल मडावी, मंगल मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना कुकडकर पुढे म्हणाले, शरीर सुदृढेकरिता खेळ हे अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळामुळे खेळाडू तंदुरुस्त राहते. अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडू प्राथमिक स्तरावर घडत असतो व भविष्यात मोठा खेळाडू बनतो असे ते म्हणाले. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 19000 रु., व्दितीय पारितोषिक 15000 रु., तर तृतीय पारितोषिक 7000 रु.  ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकुन 20 संघानी सहभाग घेतला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-17


Related Photos