जि. प. सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी घेतली वाटमोडे कुटुंबीयांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावातील रहिवासी तथा शेतकरी जगन रामा वाटमोडे यांनी 12 नोव्हेंबर 2019 ला त्यांच्या शेतीमधिल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जगन वाघमारे यांनी आपल्या 9 एकर सर्वे नं. 356 या शेतीमध्ये सोयाबीन तसेच कापूस पिकाची लागवड केली होती. जगन वाघमारे शेतपिकासाठी शेतीच्या 7/12 वर कर्ज घेतलेले होते, कर्जाची वाढ 96 हजारावर गेली होती. तसेच घरचे सोने गोल्ड लोनच्या माध्यमातून गहाण ठेवण्यात आले होते. असे एकंदरीत कर्जाचा बोजा घेत ते जिवन जगत होते. त्यांचा कुटुंबात त्यांची पत्नी लता जगन वाघमारे, मुलगी सरिता व मुलगा भुषण असे कुटुंबीय होते. जि. प. सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी त्यांचा कुटूंबियांना भेट दिली. त्यांच्या सोबत गावचे पटवारी बल्की व आर. आर.  गाते उपस्थित होते. परिवाराची आर्थिक परिस्थिती खुपच नाजुक असल्याचे दिसुन आले. त्यांच्यावर आलेल्या या संकटावर ब्रिजभुषण पाझारे यांनी जगन वाटमोडे यांचे कर्जमाफ करुन शेतपीक नुकसानीची भरपाई देण्याचे सांगितले. याप्रसंगी सरपंच बेबीताई पिसे, उपसरपंच योगेश नौकरकर, ग्रामसेवक अनिल ढेंगळे यांची उपस्थिती होती.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-17


Related Photos