जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली चिन्नु अर्का यांच्या प्रकृतीची विचारपूस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील इंदाराम (गेर्रा ) येथील रहिवासी चिन्नु अर्का (६८) यांची अचानक घरीच प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतीत माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात अहेरी येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. चिन्नु अर्का यांची प्रकृती खुपच चिंताजनक असून रुग्णवाहिकाला संपर्क साधून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. यावेळी गंगाराम तोर्रेम, मनोज नैताम, जलपत अर्का, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-15


Related Photos