धाड सत्रात 130 पेट्या देशी दारू जप्त, दोघांना अटक


बल्लारपूर पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर :
बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भगत यांच्या आदेशानुसार बल्लारपूर पोलिसांनी विविध ठिकाणी धाड टाकून 130 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली. सकाळी सहा वाजता बी. टी. एस. प्लॉट परिसरातील एका घरात 40 पेट्या देशी दारू लपुन ठेवलेली आढळून आले. त्यात दोन व्यक्तीना ताब्यात घेतले आहे. तसेच दीनदयाळ वार्डातील एका खोलीत 70 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली. गणपती वॉर्ड येथे बनत असलेल्या घरात 23 पेट्या असल्याची माहिती मिळताच ड्युटी अधिकारी जीवतोडे लगेच आपल्या ताफ्यासोबत पोहचले व तेथून 23 पेट्या देशी जप्त करण्यात आली. दुपारपर्यंत एकूण 130 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार भगत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक घागे, गायकवाड यांच्या चमूने केली. फरार झालेल्या आरोपीचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहेत,  Print


News - Chandrapur | Posted : 2019-11-13


Related Photos