जिल्हा खनिकर्म अधिकारी शेळके यास एक दिवसाची पोलिस कोठडी


- १ लाख २० हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रेती वाहतुकीच्या परवान्यावर स्वाक्षरी करुन वाहतूक परवाना देण्याकरिता कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या येथील लाचखोर जिल्हा खनिकर्म अधिकारी (वर्ग १) श्रीकांत रमेश शेळके (३१) यास आज स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रेती वाहतुकीच्या परवान्यावर स्वाक्षरी करण्यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा खनिकर्म अधिकाऱी श्रीकांत शेळके यास सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली व त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१९) च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-12


Related Photos