महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
महाराष्ट शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे या कार्यालयाकडे सोपविली असून ही परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.  इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित व विना अनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 
परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  ऑनलाईन अर्ज भरणे,परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर माहितीचा तपशिल संकेतस्थळावर देण्यात आला आहे.  सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.  सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०१९  पर्यंत आहे. ४ ते १९  जानेवारी पर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर.१  हा १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०. ३०  ते १ वाजेपर्यंत असेल तर पेपर.२ त्याच दिवशी दुपारी २ ते ४. ३०  वाजता असेल.  सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-11-11


Related Photos